ओबीसी हक्क संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने ओबीसी समाजाच्या मागण्या संदर्भात पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांची पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट घेतली. मराठा समाजासाठी शासनाने काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा येऊ नये, मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये अशी मागणी ओबीसी हक्क संघर्ष समितीने केली असून याबाबतचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले. याप्रसंगी ओबीसी हक्क संघर्ष समितीचे पदाधिकारी ओबीसी बांधव उपस्थित होते.