दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना होत असलेल्या गैरसोयीसह इतर सोयी सुविधा होत असलेल्या दिरंगाईबाबत शिवसेना उबाठा आ. गजानन लवटे,जिल्हा समन्वयक प्रदीप वडतकर आदी पदाधिकाऱ्यांनी आज बुधवार रोजी दुपारी १२ वाजता उपजिल्हा रुग्णालयात धडक दिली. तेव्हा डॉ.गुणवंत जढाळ यांनी त्यांचे स्वागत केले.त्यानंतर त्यांनी जनरल वॉर्ड, कीचनसह संपूर्ण रुगणालयाची पाहणी केली व प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.गुणवंत जढाळ यांना विविध प्रश्नांचा भडीमार करीत धारेवर धरले.