तालुक्यातील अनेक लाभार्थी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व अपंग व्यक्तींसाठीची मासिक मानधन योजना अंतर्गत नोंदणीकृत आहेत. मात्र, गेल्या ७-८ महिन्यांपासून या योजनेचे मासिक मानधन अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दैनंदिन खर्च, औषधोपचार व घरगुती जबाबदाऱ्या पार पाडणे कठीण झाले आहे. काही लाभार्थ्यांचा आधार कार्ड सिडींग संबंधित त्रुटी असता त्यांनी ती त्रुटी बँकेत जाऊन सोडविली. मात्र त्यानंतरही फायदा नाही