झटपट नदीवर पूल बांधणाऱ्या कंत्राटदार व त्यांचे बिल मंजूर करणाऱ्या संबंधित अभियंत्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे जनहीत कक्ष विभागाचे शहर अध्यक्ष पियुष धुपे यांनी निवेदनातून आज दि.१२ सप्टेंबर ला १ वाजता मनपा आयुक्त यांना दिला आहे. यावेळी मनसे जनहीत कक्ष विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.