शहरातील अकोला रोड मार्गावरील उड्डाण पुलावरती मंगळवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास एका दुचाकी चालकाचा अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकी चालक हा गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अकोला मार्गावरील उड्डाण पुलावर वाहतुकीची मोठी वर्दळ असते तर या मार्गावरून दर्यापूर कडे जाणारा वळण मार्ग तसेच अकोला नाका येथील येणारे रेल्वे स्टेशन कळील मार्ग व इतर मार्गांमुळे या ठिकाणी वाहनधारकांचा गोंधळ उडतो यामुळे अपघाताच्या घटना घडतात.