मालधक्का येथून सिमेंटच्या गोण्यांसह ट्रक चोरी करणाऱ्या दोघांना नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने सोमवार बाजार येथून ताब्यात घेतले आहे.फिर्यादी अनिल शिरसाठ यांचा सिमेंटच्या गोण्यांनी भरलेला ट्रक अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे समांतर शोध सुरू असताना गोपनीय माहितीनुसार सोमवार बाजार देवळाली गाव येथून राजू पुंडलिक चंद्रमोरे व सुरज श्याम कदम यांना ताब्यात घेऊन चोरीतील मुद्देमाल जप्त केला आहे.