जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा संयुक्त जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळा नांदगावकर,अविनाश अभ्यंकर संदीप देशपांडे यांच्यासह नाशिक मधील दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. शहरातील गुन्हेगारी जुगार, ऑनलाईन गेम, मनपा भ्रष्टाचार, महिलांवर होणारे अत्याचार, खून, दरोडे अशा विविध विषयांवर सरकार विरोधात निषेध नोंदवण्यासाठी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते सामील झाले.