श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर बगडेवाडी वासीयांच्या वतीने वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांना आज दि 24 आगस्ट ला 12 वाजता निवेदन सादर करण्यात आले. परिसरात मुख्य रस्ता व नालीचे बांधकाम न झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.नाल्याचे घाण पाणी घरामध्ये शिरत असल्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने रस्ता व नालीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.