भंडारा तालुक्यातील भोजापूर येथील ओमप्रकाश उईके वय 53 वर्षे हे दिनांक 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता दरम्यान आपल्या घराच्या अंगणात बसले असता आरोपी सुरेश मडावी वय 54 वर्षे रा. भोजापूर हा ओमप्रकाश यांच्या अंगणात येऊन ओमप्रकाश यांना जुन्या वादातून शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी सुरेश याने ओमप्रकाशला थापड बुक्क्यांनी मारहाण केली. तेव्हा ओमप्रकाश यांचे जावई भांडण सोडविण्यास आले असता आरोपी सुरेश मडावी, विष्णू मडावी व मयूर मडावी यांनी ओमप्रकाश उईके व त्यांच्या जावयाला डोक्यावर विटेने मारहाण केली