नंदिनी नदीच्या काठावर जिलेटिन सारखा स्फोटक पदार्थांच्या कांड्या ऐन गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढळून आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती.जागरूक नागरिकांच्या आधारे पोलिसांना माहिती मिळाल्यावर घटनास्थळी बॉम्ब शोधक पथक व मुंबई नाका पोलिसांनी धाव घेतली.सदर जिलेटिन मुदतबाह्य असल्याचे समोर आले.परंतु बेजबाबदारपणे स्फोटक जिलेटिनची विल्हेवाट लावणाऱ्या इसमांवर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.भंगार व्यावसायिक जाकीर अत्तार, रिहान शेख व अशोक कर्डक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.