मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनासाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव एकवटले आहेत . आंदोलकांना लागणारे साखर, बिस्किट, फरसाण, फळे, पाण्याच्या बाटल्या, लाडू यांसह हजारो रेनकोट कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबईकडे पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी आज दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता शाहूपुरी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.