मोहोळ तालुक्यातील एका गावातील रहिवासी आरोपीने त्याच्या मुला सोबत मिळून महिलेचा विनयभंग करून शिवीगाळ केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सुरज केंद्रे यांनी अंतिम अटकपूर्व जामीन मंजूर केल्याची माहिती ॲड. प्रणव उपाध्ये यांनी बुधवारी साय 5 वाजता पत्रकारांशी बोलताना दिली. यात हकीकत अशी की, यातील आरोपीचा मुलगा व फिर्यादीची मुलगी हे पती-पत्नी आहेत. घरगुती कारणावरून त्यांच्यात भांडणे असुन कौटुंबिक प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.