आज शनिवार सहा सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता माहिती देण्यात आली की, शहरातील जिल्हा परिषद मैदानावरील विहिरीत गणपती विसर्जनाला सुरुवात झाली असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले आहे, पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे, महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.