आदि कर्मयोगी अभियानाची सुरवात राज्यात 10 जुलै 2025 पासून झाली आहे.या अभियानाचा प्रमुख उद्देश आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणे हा आहे.सर्व शासकीय यंत्रणांनी नाशिक जिल्ह्यात हे अभियान सक्रिय सहभागातून व समन्वयातून यशस्वीपणे राबवावे,अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित आदि कर्मयोगी अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळेत जिल्हाधिकारी श्री.शर्मा बोलत होते.आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लिना बन्सोड आदी उपस्थित होते.