धुळे शहरातील पांझरा नदीकिनारी विसर्जनानंतर उघड्यावर पडलेल्या गणेश मूर्तींची विटंबना होऊ नये, यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने अनोखा उपक्रम राबवला. नदीकाठी व अंजनशा दर्ग्यासमोरील परिसरात पडलेल्या सर्व मूर्ती गोळा करून त्यांचे शहरातील हत्ती डोह येथे सन्मानपूर्वक विसर्जन करण्यात आले. या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत असून, भाविकांनीही पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.