आगीखेड ते पातुर रस्ता नादुरुस्त असल्याने रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.पातूर तालुक्यातील एमडीआर रोड क्र. २२ वरील टी. के. व्ही. चौक-पातूर ते आगीखेड मार्गाच्या भीषण दुरावस्थेमुळे ग्रामस्थांचा संताप उसळला आहे. दरम्यान, दुरुस्तीच्या वारंवार मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलंय. आता संतप्त ग्रामस्थांनी ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात शिक्षक कॉलनी, गजानन नगर, आगीखेड, शेलगावसह १५ हून अधिक गावांचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.