निमगाव बसस्थानकाजवळ अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकावर नांदुरा पोलिसांनी २६ ऑगस्टला सकाळी ११ वाजता कारवाई केली.या कारवाईत पोलिसांनी ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.नांदुरा पोलीस पथक निमगाव परिसरात गस्त घालत असताना त्यांना लाल रंगाचा महिंद्रा ७७५ डीआय कंपनीचा विनानंबरचा ट्रॅक्टर रेती घेऊन जाताना दिसला.पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून चालक राजीक खान सलीम खान (रा.रामपूर) याच्याकडे कागदपत्रे आणि रेतीवाहतुकीचा परवाना मागितला.परंतु त्याच्याकडे कोणतेही वैध कागदपत्रे आढळली नाही.