जिंतूर तालुक्यातील बोरी गाव येथील पेठ गल्ली, चौधरी गल्ली, माळी गल्ली आणि गुरव गल्ली या भागात गुरुवारी रात्री चोरट्यांच्या टोळक्याने धुमाकूळ घातला. काही ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला.गावातील सीसीटीव्ही कॅमेर्यात सहा-सात जणांचा चड्डी गँग चोरांचा टोळका कैद झाला असून चोरट्यांचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.