आज दिनांक अठावीस ऑगस्ट रोजी सांयकाळी सहा वाजता माहिती मिळाली की कन्नड तालुक्यातील भिलदरी शिवारात बिबट्याच्या हल्ल्याची भीषण घटना घडली आहे. शेतकरी रामधन चारदरी यांच्या शेतात बिबट्याने महशीच्या वासरावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. वासराच्या चेहऱ्यावर व नाकावर खोल जखमा झाल्या असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून भिलदरी भागात बिबट्याच्या हालचाली वाढल्या असून दोन ते चार वासरांवर हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत.