औंढा नागनाथ ते हिंगोली जाणाऱ्या रस्त्यावर पिंपळदरी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक युवक ठार झाल्याची घटना दिनांक एक जून रविवार रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. रोहन दत्तराव पावडे वय 21 वर्षे राहणार गौळ बाजार तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली असे मयत युवकाचे नाव आहे ते दुचाकी क्रमांक एमएच 38 एजी 9352 वरून जात होते अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जीएस राहिरे उपनिरीक्षक अपसर पठाण,जमादार वसीम पठाण, संदीप टाक,गजानन गिरी,ज्ञानेश्वर गोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली