भंडारा जिल्ह्यातील शिवाजी वार्ड साकोली येथील प्रफुल नामदेव भांडारकर वय 41 वर्षे याने दिनांक 1 सप्टेंबर रोजी अतिप्रमाणात दारूचे सेवन केल्याने त्याला त्याच्या कुटुंबियांनी उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल केले होते. त्याच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू असताना दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता दरम्यान त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस स्टेशन भंडारा येथे मर्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार ढोरे हे करीत आहेत.