खासदार प्रतिभा धानोरकर यांची इतर मागासवर्गीयांच्या कल्याण विषयक समितीवर (२०२५-२६) सदस्य म्हणून आज दि.९ सप्टेंबरला १२ वाजता पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे, ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी या समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा भक्कम आवाज ऐकायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लोकसभा सचिवालयाने १ सप्टेंबर, २०२५ रोजी यासंदर्भात अधिकृत पत्र जारी केले.