महाराष्ट्र राज्य क्रिडा संचालनालय पुणे व जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वरोरा येथे फिर पडलेल्या जिल्हास्तरीय मलखांब स्पर्धेत यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाच्या हर्षल ऊईके याने १४ वर्ष वयोगटात तर अंकुश वाढई याने १७ वर्ष वयोगटात जिल्ह्यात अव्वल स्थान प्राप्त केले.त्यांच्या यशामुळे शिंदे कनिष्ठ महाविद्यालय विभागस्तरावर पोहचले आहे.यशस्वी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढील यशासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.