राजुरा शहरातील रेल्वे गेटमुळे नागरिकांना, प्रवाश्यांना होणारा त्रास याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राजुरा तालुका अध्यक्ष आसिफ सय्यद यांच्या वतीने आज दि 11 सप्टेंबर ला 12 वाजता चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांना निवेदन देण्यात आले. राजुरा शहरातील मुख्य मार्गावर श्री शिवाजी महाविद्यालय जवळ असलेला रेल्वे गेट हा दररोज बराच वेळ बंद राहतो.