नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरातील शिंगवे बहुला गावात पॅरॅशूट घरावर कोसळले यात पॅरॅशूट पायलट जखमी झाला आहे.आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान नाशिकच्या देवळाली आर्टिलरी सेंटरचा जवान नियमित सराव करत होता.अपघातात जखमी झालेला पायलटवर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. ज्या घरावर पॅराशूट कोसळलं त्या घराचे नुकसान झाले आहे. अपघाताची घटना घडताच लष्करी अधिकारी जवान घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने कुठलीही यात जीवित हानी झालेली नाही.