त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर झालेल्या भीषण हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणी सर्व आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांना आज दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास देण्यात आले. निवेदन देठेवेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा, शहर अध्यक्ष (इलेक्ट