बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेवराई तालुक्यातील महापुरग्रस्त भागांची पाहणी करून शेतकरी व नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला. अचानक आलेल्या महापुरामुळे शेती, घरे आणि रस्ते यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांचे अनेक प्रश्न, अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेची समस्या मांडल्यावर पवारांनी संबंधित विभागाला सूचना केल