जागेच्या कारणावरुन शिवीगाळ करत चार ते पाच जणांनी माय-लेकीसह तिघींवर लोखंडी पाईप आणि रॉडने हल्ला केल्याची घटना बीड तालुक्यातील चहाटा येथे घडली. या हल्ल्यामधील दोघींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान चार ते पाच जणांनी केलेल्या बेदम मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. पुरुषांकडून महिलांना एवढी अमानुष मारहाण झालेली असतांनाही बीड ग्रामीण पोलीस मात्र या प्रकरणात मारहाणीचा किरकोळ गुन्हा दाखल करण्याच्या प्रयत्नात आहेत.