पारोळा येथे मृत्यूशी झुंज देणाऱ्या गाईला गौरक्षकांनी जीवदान दिले. मंगळवारी रात्री पासुन गावात फिरणारी एक मोकाट गाय ही महामार्गालगत असलेल्या हॉटेल दादाजीच्या मागील गवताळ भागात मृत्यूशी झुंज देत होती. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास गाई वर परीसरातील काही नागरिकांचे लक्ष गेल्याने त्यांनी याबाबतची माहिती पशुवैद्यकीय डॉक्टर शांताराम पाटील यांना माहिती दिली त्यानंतर त्यांनी डॉक्टर असिफ कुरेशी यांना पाठवून त्या गाईचा उपचार केला.