औसा -औसा तालुक्यातील औसा ते बुधोडा शीवरस्त्यावर भगतसिंग शिवराज आर्य हे लातूरला येण्यासाठी थांबलेले असताना अज्ञात चार व्यक्तीने छोटा हाती टेम्पो मध्ये लातूर येण्यासाठी लिफ्ट देण्याच्या बाहण्याने भगतसिंग आर्य यांना छोटा हत्तीच्या पाठीमागे टपामध्ये बसवले व सदर छोटा हत्ती थोडा पुढे रस्त्याच्या आला असताना छोटा हत्ती मधील चार जणांनी संगणमत करून आर्य यांना लाथा बुक्क्यानी मारहाण करत त्याला धाक दाखवून खिशातील रोख रक्कम 2 ह. रु. व मोबाईल अंदाजे 10 हजार रुपये असा एकूण 12,000 ऐवज लुटला आहे.