धुळेतील १३० वर्षांहून अधिक परंपरेचा मानाचा 'खुनी गणपती' विसर्जन सोहळा यंदाही धार्मिक सलोख्याचे प्रतीक ठरला. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने १८९५ पासून सुरू झालेल्या या उत्सवात खुनी मशिदीसमोर मुस्लिम बांधवांनी गणरायाच्या पालखीचे स्वागत करून आरती व पुष्पवृष्टी केली. संघर्षाच्या स्थळी उमटलेला हा सौहार्दाचा देखावा हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देत सामाजिक एकात्मतेचे फूल फुलवणारा ठरला.