आष्टी जुगार अड्ड्यावर धाड, 24 ऑगस्ट दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहिती वरून आष्टी शहराजवळील पिंपळी धामणगाव येथील खंडोबा मंदिर परिसरात जुगार खेळणाऱ्या ९ जणांना आष्टी पोलिसांनी गस्तीदरम्यान रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि ६ मोटरसायकलसह एकूण ४ लाख ४३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल राणोजी पांढरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.