राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर श्रमदान, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमा अशा अनेक उपक्रमांद्वारे गड-किल्ला संवर्धनाची चळवळ उभी राहिली आहे. रविवारी सकाळी सात वाजता महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड किल्ल्यावर गडकोट मोहीम उपक्रम राबविण्यात आला. खासदार निलेश लंके यांच्यासह पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विद्यमान प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकारी उपस्थित होते.