मी युथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र, चंद्रपूर तर्फे सादर केलेले निवेदन आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या निवासस्थानी आज दि। 24 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता स्वीकारले .यावेळीआ जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या संघटनेने "ऑनलाईन जुगार हटाव देशाचा युवा वाचवा" हे अभियान राबविले आहे. युवकांना ऑनलाईन जुगाराच्या व्यसनापासून दूर ठेवणे, त्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन करणे आणि देशाच्या भविष्यासाठी सक्षम बनविणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.