रावेर शहरात पाराचा गणपती गणेश मंडळ आहे. व तेथे ओम क्लिनिक आहे. येथे लावलेली फकीरा जयराम महाजन यांची मोटरसायकल क्रमांक एम.एच.१९ सी.एम.४०१८ ही कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली हा प्रकार निदर्शना झाल्यानंतर प्रारंभी सर्वत्र मोटरसायकलचा शोध घेण्यात आला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून आली नाही म्हणून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.