अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असणाऱ्या अकोलखेड येथे पोळ्याच्या दिवशी कावड मिरवणूक काढण्याची परंपरा असून आज शनिवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी अकोलखेड येथे कावड मिरवणूक पार पडली या मिरवणुकीमध्ये एकूण ४ शिवभक्त कावड मंडळांनी सहभाग घेतला होता तर वाजत गाजत गावातील प्रमुख मार्गांवरून ही कावड मिरवणूक काढण्यात आली यावेळी हर बोला महादेव, हर हर महादेव चा गजर ऐकायला येत होता.मिरवणूककीचे ठिकठिकाणी विविध संस्था संघटनांच्या वतीने स्वागत करण्यात येऊन कावडचे पूजन करण्यात आले