वंधली–माढेळी मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामातील निष्काळजीपणामुळे आज दि २८ सप्टेंबर ला सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास एक गंभीर अपघात घडला. MH34 BG 9983 क्रमांकाची 102 ॲम्बुलन्स चिखलमय रस्त्यावर घसरून नियंत्रण सुटल्याने पुलावरून खाली कोसळली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असून गर्भवती महिला सुखरूप बचावली आहे.