धुळे शहरात जुना आग्रा रोड येथे 31 ऑगस्ट रविवारी दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान दोन माथेफिरूची आपापसात भांडणे सुरू होती. त्यावेळी रस्त्यावर गर्दी झाली. रस्त्यावर वाहतूक कोंडी व गर्दी होऊ नये यासाठी कर्तव्यावर असलेले शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला . माथेफिरुचे भांडण सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु याच दरम्यान शहर वाहतूक शाखेच्या दोन ते तीन कर्मचाऱ्यांवर एका माथेफिरुन हाताने हल्ला चढवला पोलीस कर्मचाऱ्यांना हाणामारी केली अपशब्दही वापरले