पारखेड फाट्यावर गुटख्याचा कंटेनर स्थानिक गुन्हे शाखेने आज दिनांक ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजे दरम्यान पकडला.या कारवाईने गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीदरम्यान पारखेड फाटा परिसरात थांबलेल्या एका कंटेनरवर संशय आल्याने सदर कंटेनरची तपासणी केली असता कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा साठा आढळून आला. महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर साठा जप्त झाल्याने या कारवाईचे गांभीर्य अधिक वाढले.