शहरात शनिवारी (दि. 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता झालेल्या मुसळधार पावसामुळे रामपीर नगर, डाबकी रोडसह विविध भागात रस्त्यावर पाणी साचून मोठी डबकी तयार झाली. घरांच्या भिंतीलगत पाणी साचल्याने भिंती जीर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेने नाल्यांचा स्लोप व्यवस्थित न केल्याने ही समस्या उद्भवल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाचे पाणी वेळेवर न वाहून न गेल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करण्यात आला.