गडचिरोली: महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर गडचिरोली पोलीस दल आणि CRPF यांच्या संयुक्त कारवाईत ४ जहाल माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. या माओवाद्यांवर एकूण १४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या चकमकीत एका वरिष्ठ कॅडर पीपीसीएमसह तीन सदस्य श्रेणीतील माओवाद्यांचा समावेश आहे.