सारडा सर्कल येथे सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे महागड्या गाडीतून अपहरण करण्याचा प्रयत्न केला घडला असून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही खाजगी क्लास वरून सारडा सर्कल,नॅशनल जुनियर कॉलेज येथून रस्ता क्रॉस करत असताना थार-रॉक्स या चारचाकी गाडीतून आलेल्या एका इसमाने अश्लील हावभाव करून फिर्यादीला गाडीत बसण्यास सांगितले.नकार दिला असता रस्ता अडवून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.