दापोरी येथे आयशर चार चाकी वाहनातून बँड पार्टीचे स्टुडिओ मास्टर कंपनीचे चार मिक्सर मशीन चोरीला गेल्याची घटना दिनांक 28 ऑगस्टला रात्री आठ वाजता उघडकीस आली आहे. याबाबतीत दापुरी येथील संजय विठ्ठल राव नागले यांनी दिनांक 29 ऑगस्टला बारा वाजून 46 मिनिटांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध मोर्शी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. संजय नागले यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे