शहरातील बाळासाहेब ठाकरे चौकात झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून संबंधित कारचे मोठे नुकसान झाले आहे. एमएच ४४ एई २१५१ या क्रमांकाची कार वेगात जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे सदर कारने चौकात अचानक वळण घेताना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारचा समोरील भाग पूर्णपणे नुकसान ग्रस्त झाले आहे. अपघातात कारमधील दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.