बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार घेणारे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांनी जिल्ह्यात अवैध धंद्याविरुध्द कारवाईची धडक मोहिम हाती घेतलेली आहे. दरम्यान एलसीबी पथकाने ११ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजे दरम्यान शेगांव आळसना रोड वरील मिलत नगर येथे घरगुती वापराच्या सिलेंडरमधील गॅस वाहनांमध्ये भरुन देणाऱ्यास पकडले आहे.