लोणी लव्हाळा येथील अट्टल गुन्हेगार जखमेश्वर शेनफड शिंदे याला साखरखेर्डा व अमडापूर पोलिसांनी २६ ऑगस्ट रोजी अमडापूर लव्हाळा रोडवर पाठलाग करून अटक केली. जखमेश्वर शेनफड शिंदे विरुद्ध साखरखेर्डा, किनगाव राजा व अमडापूर पोलीस स्टेशनला विविध गुन्हे दाखल आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे ठाणेदार गजानन करेवाड, निखिल निर्मळ व त्यांच्या पथकांनी सापळा रचून अटक केली.