पेठवडगाव येथील डवरी गल्ली येथे झालेल्या खुनाच्या घटनेतील आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत अटक करून जेरबंद केले आहे.संभाजी धर्मा साळुंखे (वय ५०,रा.पेठवडगाव) यांचा खून करण्यात आलेला होता.या प्रकरणी किरण भिमराव जगताप (वय २७, रा.यादवनगर, कोल्हापूर) याला अटक करण्यात आली आहे.ही घटना ८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली.आरोपीने लाकडी फळीने डोक्यात प्रहार करून संभाजी साळुंखे यांचा खून केला होता.