साक्री तालुक्यातील चिकसे येथील गांगेश्वर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात गाईचे वासरू ठार झाल्याची घटना घडली.गुरुवारी २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास बंदीस्त वाड्यातील गोठ्यात बांधलेल्या दोन ते अडीच वर्षाच्या गाईच्या वासरूला बिबट्याने फस्त केले. येथील शेतकरी ताराचंद पाताळपुरे यांच्या शेतात गुरा-ढोरांचा जाळीने बंदीस्त वाडा आहे. वाड्याची जाळी तोडून बिबट्याने आत प्रवेश करत वासरू वर हल्ला करून ठार केले अशी माहिती हरीश पाताळपुरे यांनी १०.३० वाजता दिली