आपण बऱ्याचदा सासरच्या कुटुंबियांनी सुनेला मारले असल्याच्या बातम्या दर दिवसाआड येतच असतात मात्र सुनेची कधी तरी पूजा केलेला प्रसंग क्वचितच ऐकला असेल, नाही का? तर मग बघा कंधार शहरातील येईलवाड कुटुंबियांनी आजरोजी दुपारी 1 आपल्या राहत्या घरी गौरी पूजन सोहळ्याच्या मंगलमय प्रसंगी आपल्या तिन्ही सुनांची लक्ष्मी म्हणून पूजा आरती केली आहेत. खरी लक्ष्मी ही सून मानून सुनेची पूजा करणे म्हणजे पुरोगामी संकल्पना असल्याचे दिसून येत आहे.