बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी मागील 12,13 ऑगस्टला जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली होती.या दरम्यान आपल्या कर्तव्यातील दिरंगाई सोबतच असुविधांचा कळस गाठणाऱ्या 4 प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 14 कर्मचाऱ्यांवर त्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गीते यांनी आज 25 ऑगस्टला दुपारी माहिती दिली आहे.